
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचे पवार कुटुंब पुन्हा एकत्र येईल का, याबाबत चर्चेला उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन भागांमध्ये विभाजन झाल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील वाद संपुष्टात येण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्रींनी विठुरायाला साकडे घातले.