Indurikar Maharaj Akkalkot Ashadhi Ekadashi Kirtan
esakal
अक्कलकोट शहर : कर्माला माफी नाही. या कलियुगात संतांशिवाय माणूस सुखी होणार नाही. जगाला सुखी व्हायचे असेल, तर हरीनामाशिवाय पर्याय नाही. मीपणा आणि अहंकारामुळे माणसाच्या जीवनाचा अंत होतो. त्यापासून दूर राहिल्यास आनंद आणि समाधान (Gurupournima Mahotsav Akkalkot 2026) लाभते. आई-वडील आणि संत हेच जीवनातील खरे मार्गदर्शक असून, आजच्या युगात माणसापेक्षा पैशाला अधिक किंमत मिळत असल्याने माणुसकी हरवत चालली आहे, असे परखड प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार व धर्मप्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांनी केले.