Akkalkot Policeesakal
सोलापूर
सोशल मीडियावर औरंगजेबाचं उदात्तीकरण; गुन्हा दाखल झालेले 22 पैकी 11 औरंगजेबप्रेमी अल्पवयीन, पोलिसांची कारवाई
Akkalkot Police : अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी (Sachin Kalyanshetty) यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर ठेवून समाजात तेढ निर्माण केली जात असल्याबद्दल विधानसभेत आवाज उठविला होता.
Summary
सोशल मीडियावर सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण करून अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांवर पोलिसांची बारीक नजर आहे. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे.
अक्कलकोट : सोशल मीडियावर औरंगजेबाचे (Aurangzeb) उदात्तीकरण करणाऱ्या आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करून सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण करून अराजकता माजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या २२ जणांविरुद्ध अक्कलकोट उत्तर व दक्षिण पोलिसांत (Akkalkot Police) गुन्हे दाखल झाले आहेत. गुन्हा दाखल झालेल्या २२ जणांपैकी ११ जण अल्पवयीन आहेत.
