

Solapur
esakal
सोलापूर: अक्कलकोटमधील एका हायस्कूलचे रंगकाम सुरू होते. त्याठिकाणी कामास गेलेल्या तरुणाने शाळेतील १३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केला. २१ मार्च २०२४ रोजी हा प्रकार घडला होता. त्यानंतर तो तरुण पीडितेच्या मागे लागला आणि तिला सतत त्रास देत होता. या त्रासाला कंटाळलेल्या पीडितेच्या वडिलांनी अक्कलकोट उत्तर पोलिसांत धाव घेतली. त्यावरून अरबाज अब्दुल हालदिवटे (वय २३, रा. अक्कलकोट) याच्याविरुद्ध 'पोक्यों अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली.