अकलूज : रात्रभर पाऊस झाल्याने पत्रा शेडच्या गोठ्यात पाणी साचले. त्यात विद्युतप्रवाह (Electric Current) उतरला. त्यामुळे गोठ्यातील गाय मृत्युमुखी पडली. सकाळी गोठ्यात निपचित पडलेल्या गायीला उठवताना सासुला विजेचा धक्का बसून ती गतप्राण झाली. थोड्या वेळाने सासुला उठवण्याच्या प्रयत्नात सुनेचाही करुण अंत झाला.