Solapur: शेतमालकाच्या मुलाने केला मजुराच्या ३५ वर्षीय पत्नीचा जीव घेतला, भरदुपारी डोक्यात घातली गोळी; संशयित जेरबंद

Woman Shot Dead in Malshiras Farm: माळशिरस तालुक्यातील चौंडेश्वरवाडी येथे शेतमालकाच्या मुलाने ३५ वर्षीय शेतमजूर महिलेच्या डोक्यात गोळी झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.
Solapur

Solapur

esakal

Updated on

अकलूज: चौंडेश्वरवाडी (ता. माळशिरस) येथे शेतमालकाच्या मुलाने सोमवारी भरदुपारी शेतात निघालेल्या शेतमजुराच्या ३५ वर्षीय पत्नीचा डोक्यात गोळी घालून खून केला आहे. या प्रकरणी मृत महिलेच्या पतीने अकलूज पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरून सचिन जगन्नाथ देशमुख याच्याविरुद्ध अकलूज पोलिसांत खूनासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. पळून जात असताना पोलिसांनी त्याला अटक केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com