पटकन होणार जमिनीची वाटणी 

logo
logo
Updated on

सोलापूर : कुटुंबातील जमिनीची विभागणी करताना होणारा त्रास आणि विलंब कमी करण्यासाठी संमतीने अभिलेख पोटहिस्सा या पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. यामुळे पोटहिस्सा विभागणी करण्याची प्रक्रिया सोपी झाली आहे. नागरिकांनी अभिलेख अद्ययावत करण्यासाठी उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन दक्षिण सोलापूरचे उप अधीक्षक किरण कांगणे यांनी केले आहे. 
हेही वाचा - अनाथांच्या आरक्षणावर "कोणी' मारला डल्ला 
शेतजमिनीची खातेफोड करून वाटप करताना सर्व हिस्सेदारांना समान प्रमाणात जमीन येण्यासाठी मोजणी केली जाते. हे वाटप करताना कुटुंबातील कोणाचीही हरकत नसते; पण जमिनीची विभागणी करून सातबारा उताऱ्यावर नोंदणी करण्याची प्रक्रिया वेळखाऊ आणि किचकट असल्याने अनेक कुटुंबातील जमिनीचे वाटप होऊ शकत नाही. ही अडचण लक्षात घेऊन राज्याचे जमाबंदी आयुक्त एस.चोक्कलिंगम यांनी 18 नोव्हेंबर 2019 रोजी संमतीने अभिलेख पोटहिस्सा याबाबतचे परिपत्रक जारी करून ही प्रक्रिया सोपी केली आहे. 
हेही वाचा - हिमालयातील पाहुणा पंढरपुराच्या भेटीला 
संमतीने अभिलेख पोटहिस्सा प्रत्यक्ष जागेवर जाऊन मोजणी न करता कार्यालयातच केली जाते. सर्वसंमतीने उपविभाग करावयाच्या या कार्यपद्धतीचे नामकरण संमतीने अभिलेख पोटहिस्सा, असे करण्यात आले आहे. पोटहिस्सा मोजणीच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक श्‍याम खामकर यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गट स्थापन करण्यात आला होता. जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध आणि त्यांचे एकत्रीकरण करणे अधिनियम 1947 मध्ये असलेल्या तरतुदीस अधीन राहून ही नवीन पद्धती अमलात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Historic Ritual: Fadnavis Offers Mahapuja to Bhagwant for the First Time
Photo
Why was Vande Bharat delayed in Pune?
Solapur Tour May Decide Fate of Long-Pending Rail Project
Marathi News Esakal
www.esakal.com