सोलापूर महापालिका हद्दीत गुंठेवारी बांधकामाची परवानगी द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Praniti Shinde
सोलापूर महापालिका हद्दीत गुंठेवारी बांधकामाची परवानगी द्या

सोलापूर महापालिका हद्दीत गुंठेवारी बांधकामाची परवानगी द्या

सोलापूर : पुणे, औरंगाबाद, नाशिक व लातूर महापालिकेच्या हद्दवाढ भागात ज्या पध्दतीने गुंठेवारीच्या जागेत बांधकामाची परवानगी दिली जाते त्याच धर्तीवर सोलापूर महापालिका क्षेत्रातील(solapur carporation) हद्दवाढ भागामध्ये गुंठेवारी बांधकाम परवानगी(construction permission) द्यावी, अशी मागणी आमदार प्रणिती शिंदे(mla praniti shinde) यांनी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात सोलापूर महापालिका आयुक्तांनी २२ डिसेंबरला सादर केलेला प्रस्तावावर तत्काळ अभिप्राय देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

हेही वाचा: विद्यार्थ्यांना शाळेत बोलावू नका! शाळा 15 फेब्रुवारीपर्यंत बंद

आमदार शिंदे म्हणाल्या, सोलापूर शहर व विशेषत: हद्दवाढ भागातील बहुतांश भाग हा गुंठेवारी भागातून विकसित होत आहे. महापालिका आयुक्तांनी गेल्या काही महिन्यापासून गुंठेवारी अधिनियामान्वये नियमितीकरणाचे बांधकाम परवानगी प्रकरणे थांबविली आहेत. महापालिकेने गुंठेवारी बांधकाम परवानगी सुरु केली नाही, याउलट आयुक्तांनी त्या प्लॉटची मोजणी करून आणा मगच बांधकाम परवानगी दिली जाईल अशी भूमिका घेतली आहे. गुंठेवारीच्या अधिनियमामध्ये अशाप्रकारची कोणतीही नोंद नाही.त्यामुळे नागरीकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पुणे महापालिका वाढीव क्षेत्रात (हद्दवाढ भाग) गुंठेवारी अधिनियमान्वये परवानगी देत आहे. गुंठेवारी विकासाचा कच्चा नकाशा तरतूद नसल्याने मोजणी नकाशा अपेक्षित नाही.

हेही वाचा: सोलापूर : विधवा सुनेचे केलं कन्यादान! शिक्षक दाम्पत्यानं घालून दिला आदर्श

गुंठेवारी विकासाचा कच्चा नकाशा विकास योजनेशी सांगड व साधर्म साधून आरक्षण अथवा इतर वापर विभाग तपासून नियमीतीकरणाचे परवानगी दिले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. सोलापुरात गुंठेवारी बांधकामाची परवानगी मिळत नसल्याने नागरीकांमध्ये आयुक्तांच्या विरोधात मोठ्याप्रमाणात नाराजी होत असल्याचेही आमदार शिंदे यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top