
सोलापूर जिल्ह्यातील रुग्णवाढ व मृत्यूदर कमी झाला नसल्याने ते दौऱ्यावर येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
सोलापूर : शहर-जिल्ह्यातील कोरोना (Covid-19) रुग्णवाढ व मृत्यूदराबाबत भाजप नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांनी शनिवारी (ता. 29) सोलापूर दौरा केला. त्या वेळी त्यांनी महापालिका प्रशासनावर टीकेची झोड उठवली. तर परिवहन मंत्री अनिल परब (Transport Minister Anil Parab) यांच्यावरही आरोप केले. त्यानंतर लगेचच वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख (Medical Education and Culture Minister Amit Deshmukh) यांचा सोलापूर दौरा ठरला. ते आज (सोमवारी) सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. (Amit Deshmukh in Solapur today after Kirit Somaiya's allegations)
देशमुख हे बाभळगाव येथून मोटारीने सकाळी दहा वाजता सोलापूर दौऱ्यावर निघणार आहेत. सकाळी साडेअकरा वाजता ते सोलापुरातील सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात येणार आहेत. त्यानंतर दुपारी 12 वाजता डॉ. वैश्यंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेणार आहेत. त्यासाठी खासदार, आमदारांसह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना निरोप देण्यात आला आहे. तसेच त्यांच्या विभागाशी संबंधित सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही त्याची माहिती देण्यात आली आहे. दुपारी एक वाजता पत्रकार परिषद घेऊन ते दुपारी दीड ते अडीच वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह येथे थांबणार आहेत. त्यानंतर ते दुपारी साडेतीन वाजता उस्मानाबादकडे रवाना होणार आहेत.
दरम्यान, भाजप नेते सोमय्या यांनी सोलापूर दौरा केल्यानंतर लगेचच अमित देशमुख यांचा दौरा ठरल्याची चर्चा आहे. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील रुग्णवाढ व मृत्यूदर कमी झाला नसल्याने ते दौऱ्यावर येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.