esakal | पडळकरांच्या गाडीवर दगड मारणाऱ्या अमितने छातीवर गोंदवले शरद पवार !
sakal

बोलून बातमी शोधा

Tattoo

पडळकरांच्या गाडीवर दगड मारणाऱ्या अमितने छातीवर गोंदवले शरद पवार !

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरील टीकेचा राग मनात धरून सोलापुरातील अमित सुरवसे या युवकाने आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगड मारला होता.

सोलापूर : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावरील टीकेचा राग मनात धरून सोलापुरातील अमित सुरवसे या युवकाने आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) यांच्या गाडीवर दगड मारला होता. त्याच्या सोबतीला नीलेश क्षीरसागर हादेखील होता. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर एक बाब समोर आली. अमितच्या छातीवर शरद पवार यांचे चित्र गोंदवलेले असून त्याखाली "द वॉरिअर' असे लिहिले आहे. (Amit, who threw stones at Gopichand Padalkar's car, got Sharad Pawar's tattoo on his chest-ssd73)

हेही वाचा: "एमपीएससी'च्या फेरनिकालात अनेकांची हुकणार संधी !

ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर भाजप आमदार पडळकरांनी राज्यभर घोंगडी बैठकांचे नियोजन केले होते. त्या निमित्ताने पडळकर हे 30 जून रोजी सोलापुरात आले होते. त्यांनी पत्रकार परिषदेत तिसऱ्या आघाडीवरून थेट राष्ट्रवादीचे सर्वेर्सवा शरद पवार यांच्यावरच निशाणा साधला. पत्रकार परिषदेनंतर त्यांनी सोलापुरात विविध ठिकाणी बैठका घेतल्या. सोलापूर शहरातील भवानी पेठ परिसरातील बैठक आटोपून पडळकर सात रस्ता परिसरातील शासकीय विश्रामगृहाकडे निघाले होते. त्या वेळी त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या अमितने पडळकरांच्या गाडीच्या समोरील काचेवर मोठा दगड फेकला आणि तिथून पळ काढला. तीन दिवस अमित पोलिसांना सापडलाच नव्हता. शेवटी हिप्परगा परिसरातील एका शेतातील झाडाखाली ते दोघेही पोलिसांना सापडले. पोलिसांनी त्यांच्याकडे सखोल चौकशी केली. त्यानंतर त्यांच्याकडून बॉंड लिहून घेऊन सोडून देण्यात आले. आता त्यांना न्यायालयातून जामीन घ्यावा लागणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

हेही वाचा: पंढरपूरच्या प्रांताधिकारी पदासाठी फिल्डिंग !

अमितच्या उत्तराने पडले पोलिसही विचारात

अमितला पकडल्यानंतर जोडभावी पेठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब भालचिम (Senior Police Inspector Balasaheb Bhalchim) यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला. त्या वेळी अमित हा पदवीधारक असून त्याने यापूर्वी "एमपीएससी'च्या दोनवेळा परीक्षाही दिल्या आहेत. त्याने पोलिसांना सांगितले की, शरद पवार यांचे राज्याच्याच नव्हे तर देशाच्या विकासात मोठे योगदान आहे. महिलांना राजकारणात 50 टक्‍के तर नोकरीत 33 टक्‍के आरक्षण दिले. त्यामुळे अनेक गोरगरीब कुटुंबातील मुली नोकरीत गेल्या. शेतकऱ्यांसाठी त्यांनी खूप काही केले आहे. समाजकारण करताना त्यांनी स्वत:च्या कुटुंबाकडेही पुरेसा वेळ दिला नाही. तरीही, पडळकरांनी खालच्या स्तरावर जाऊन त्यांच्यावर टीका केली. त्यामुळे मी ते कृत्य केल्याची कबुली अमितने दिल्याचेही पोलिसांनी सांगितले.

loading image