Anganwadi Sevika : 'माझी लाडकी बहीण योजने'चा फॉर्म भरताना कार्यालयातच अंगणवाडी सेविकेचा Heart Attack ने मृत्यू

कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) निधन झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
Anganwadi Sevika
Anganwadi Sevikaesakal
Summary

सध्या गावोगावच्या अंगणवाडी सेविकांवर 'मुख्यमंत्री -लाडकी बहीण' योजनेचा सर्व्हे करून फॉर्म भरण्याची जबाबदारी राज्य सरकारने दिलेली आहे.

Majhi Ladki Bahin Yojana : देगाव (वाळूज) ता. मोहोळ येथील अंगणवाडी क्रमांक- १ च्या सेविकेचे (Anganwadi Sevika) शासनाच्या "मुख्यमंत्री लाडकी बहीण" योजनेचा (Majhi Ladki Bahin Yojana) फॉर्म भरत असताना अंगणवाडीतच तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने आज (ता. 10 सकाळी 11 वाजता निधन झालं. सुरेखा रमेश आतकरे (वय 48) असे मृत अंगणवाडी सेविकेचे नाव आहे.

कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) निधन झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. सुरेखा आतकरे या शांत स्वभावाच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. शासनाकडून निराधार झालेल्या या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

Anganwadi Sevika
'लाडकी बहीण'ला कर्नाटकातील प्रमाणपत्राची अडचण; स्थलांतरित युवती, विवाह झालेल्या महिलांचे अर्ज नाकारले

याबाबत अधिक माहिती अशी, की सध्या गावोगावच्या अंगणवाडी सेविकांवर 'मुख्यमंत्री -लाडकी बहीण' योजनेचा सर्व्हे करून फॉर्म भरण्याची जबाबदारी राज्य सरकारने दिलेली आहे. गावोगावच्या अंगणवाडी सेविका गावात घरोघरी फिरून, तसेच कार्यालयात 'नारी दूत' या ॲप वरून फॉर्म भरीत आहेत. देगाव (वाळूज) येथील अंगणवाडी क्रमांक-1 येथे मृत सुरेखा आतकरे या बुधवारी गावात फॉर्म भरत असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्या खुर्चीतच कोसळल्या.

मदतनीस या स्वयंपाक घरात भांडी घासत होत्या. त्यांच्या कानावर जोराचा आवाज आला म्हणून, त्यांनी आत जाऊन पाहिले असता, सेविका आतकरे या खुर्चीत निपचित पडल्याचे त्यांना दिसले. त्यांना तत्काळ उपचारासाठी मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता, डॉक्टरांनी तपासून उपचारापूर्वीच मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर या घटनेची नोंद मोहोळ पोलीस ठाण्यात झाली आहे. त्यांच्या निधनामुळे देगाववर शोककळा पसरली आहे.

Anganwadi Sevika
जोतिबा डोंगरावरील देवस्‍थानची तब्बल 150 एकर जमीन खासगी ठेकेदाराला दिली; करार रद्दसाठी पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

मला ही दु:खद घटना समजल्या बरोबर रुग्णालयात जाऊन त्यांच्यावर तात्काळ उपचार करण्यासाठी मी सर्व तयारी केली होती. तपासणीनंतर त्या जागीच मृत पावल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, अंगणवाडी कर्मचारी अपघाताने, तसेच कामावर अकस्मात मृत्यू झाल्यास त्यांना शासनाकडून एक लाख रुपये मदत देण्यात येते. तसेच 50 वयोगटातील अंगणवाडी सेविकांना या कामातून सूट द्यावी, अशी मागणी वरिष्ठाकडे करणार आहे.

-किरण सूर्यवंशी, महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी, मोहोळ

आषाढी वारी झाल्यानंतर आम्ही निर्णय घेतला आहे. सर्व अंगणवाडी सेविका ऑफलाइन फॉर्म भरतील, व ते कार्यालयात जमा करतील. पुढची प्रक्रिया संबंधित अधिकाऱ्यांनी करावी. सोमवारपासून राज्यभर मोर्चे काढणार आहोत. तसेच अंगणवाडी सेविकांना वेळेचे बंधन घातल्याने मोठी अडचण झाली आहे.

-सूर्यमनी गायकवाड, जिल्हा अध्यक्ष अंगणवाडी सेविका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com