
सोलापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरलेल्या अंगणवाडी सेविकांच्या प्रोत्साहन भत्त्यापोटी जिल्ह्याच्या महिला व बालविकास विभागाला १ कोटी ३७ लाख ७७ हजार ७०० रुपये प्राप्त झाले आहेत. मात्र, पैसे आले तरी अंगणवाडी सेविकांना ते पुढील आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना आणखी वाट पहावी लागणार आहे.