
Anganwadi Workers Morcha In Solapur: उन्हाची तीव्रता वाढल्याने अंगणवाडीची वेळ सकाळी ८ ते ११.३० करावी, प्रोत्साहन भत्त्यामधील जाचक निकष रद्द करावेत, ३ ते ६ वयोगटातील लाभार्थ्यांचे फोटो काढण्याची सक्ती रद्द करावी, यासह विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनासह सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी (ता. १७) जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी दुपारच्या उन्हात छत्रीसह जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला.