'आता कारवाई मागे नाही; आधी कामावर रुजू व्हा, नंतर बोलणी करू' | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'आता कारवाई मागे नाही; आधी कामावर रुजू व्हा, नंतर बोलणी करू'
'आता कारवाई मागे नाही; आधी कामावर रुजू व्हा, नंतर बोलणी करू'

'आता कारवाई मागे नाही; आधी कामावर रुजू व्हा, नंतर बोलणी करू'

सोलापूर : एसटी कामगारांवर (ST Workers) कारवाई होऊ नये यासाठी त्यांना चारवेळा संधी देण्यात आलेली होती. याबाबतीत वेळोवेळी आवाहन करूनही एसटी कर्मचारी कामावर परतले नव्हते. आता कर्मचाऱ्यांनी अगोदर कामावर रुजू व्हावे, त्यानंतर कोणाशीही बोलणी करायला सरकार तयार आहे, असे मत परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी सोलापुरात व्यक्त केले. (Anil Parab said that action against ST employees will not be withdrawn)

हेही वाचा: काकांचा राजीनामा तूर्तास नाही! पवारांच्या भेटीविनाच परतले साठे

अनिल परब हे शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते. परिवहन महामंडळाचे अधिकारी व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्यांची त्यांनी आढावा बैठक घेतली. या वेळी पत्रकारांशी बोलताना अनिल परब म्हणाले, एसटी कामगारांवर करण्यात आलेली कारवाई आता मागे घेतली जाणार नाही. कर्मचाऱ्यांनी अगोदर कामावर रुजू व्हावे, त्यानंतरच बोलणी करू. तसेच सदावर्ते यांच्या जीवाला धोका असेल तर त्यांनी रीतसर पोलिस संक्षण घ्यावे.

ते पुढे म्हणाले, ज्या एसटी कामगारांवर आता कारवाई करण्यात आलेली आहे, ती मागे घेण्यात येणार नाही. दिवाळीच्या अगोदर आत्तापर्यंत सरकारनं 50 एसटी कर्मचाऱ्यांच्या गटांना भेटी दिल्या आहेत. 28 युनियनच्या कृती समित्यांबरोबर करारही केला आणि बाकीच्या मागण्याही मान्य केल्या, तरीसुद्धा ते आंदोलन मागे घेत नाहीत, याचा अर्थ एसटी कामगारांचे आंदोलन चुकीच्या दिशेने भरकटत चालले आहे.

हेही वाचा: स्टार्टअप्स देणार 20 लाख लोकांना रोजगार! असा आहे सरकारचा प्लॅन

दरम्यान, गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadawarte) यांच्या जीवाला धोका आहे, या हवेतल्या गोष्टी आहेत. जर त्यांच्या जीवाला धोका असेल तर त्यांनी रीतसर पोलिस संरक्षण (Poloce Security) मागावे, शासन ते देईल. कोणाच्याही जीवाला धोका करण्याची इच्छा नाहीये, असेही अनिल परब यांनी सांगितले.

बातमीदार : विश्‍वभूषण लिमये

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top