esakal | फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीला नॅशनल एज्युकेशनल एक्‍सलन्स ऍवॉर्ड जाहीर 
sakal

बोलून बातमी शोधा

Fabtech College

येथील फॅबटेक टेक्‍निकल कॅम्पसमधील फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयास 2020 चा नॅशनल एज्युकेशनल एक्‍सलन्स अँड कॉन्फरेन्स ऍवॉर्ड जाहीर झाला आहे. 

फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीला नॅशनल एज्युकेशनल एक्‍सलन्स ऍवॉर्ड जाहीर 

sakal_logo
By
दत्तात्रय खंडागळे

सांगोला (सोलापूर) : येथील फॅबटेक टेक्‍निकल कॅम्पसमधील फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयास 2020 चा नॅशनल एज्युकेशनल एक्‍सलन्स अँड कॉन्फरेन्स ऍवॉर्ड जाहीर झाला आहे. 

रिसर्च इंटेलिजिअन्स प्रा. लि. बंगळूर यांच्यातर्फे 27 नोव्हेंबर रोजी ताज वेस्ट अँड बंगळूर या ठिकाणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय बैस यांना ऍवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे कॅम्पस डायरेक्‍टर संजय अदाटे यांनी दिली. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक भाऊसाहेब रूपनर यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय बैस यांचे अभिनंदन केले. 

नॅशनल एज्युकेशनल एक्‍सलन्स ऍवॉर्ड 2020 यामध्ये देशभरातील अडीचशेहून अधिक महाविद्यालये, अनेक ऍकॅडमिक इन्स्टिट्यूट तसेच शाळांनी आपला सहभाग नोंदविला होता, अशी माहिती प्राचार्य डॉ. संजय बैस यांनी दिली. हा ऍवॉर्ड महाविद्यालयामध्ये असणाऱ्या सोयीसुविधा यामध्ये महाविद्यालयाचे इन्फ्रास्ट्रक्‍चर, सुसज्ज लॅब, इन्स्ट्रुमेंट, कॉम्प्युटर लॅब, वर्गखोल्या, लायब्ररी, सेमिनार हॉल तसेच या ठिकाणी असणारा अनुभवी प्राध्यापक वर्ग व महाविद्यालयाचा 100 टक्के निकाल या बाबींची दखल घेऊन जाहीर करण्यात आला आहे. 

सांगोलासारख्या ग्रामीण भागामध्ये असणारे हे महाविद्यालय व या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या सोयीसुविधा ही महाविद्यालयाची जमेची बाजू आहे. सध्या कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचे ऑनलाइन तास घेतले जात आहेत. तसेच या पुरस्काराचे सर्व श्रेय या ठिकाणी ज्ञानदान करीत असलेल्या सर्व प्राध्यापकांना देण्यात येत आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्राचार्य डॉ. संजय बैस यांनी समाधान व्यक्त केले आहे. 

पुरस्कार मिळाल्याबद्दल फार्मसीचे प्राचार्य डॉ. संजय बैस यांचा संस्थेचे कार्यकारी संचालक दिनेश रूपनर यांनी सत्कार केला. कॅम्पस डायरेक्‍टर संजय अदाटे, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. शेंडगे, पॉलिटेक्‍निकचे प्राचार्य प्रा. शरद पवार, स्टुडंट डीन प्रा. टी. एन. जगताप यांनी देखील त्यांचे अभिनंदन केले. या वेळी अभियांत्रिकी, पॉलिटेक्‍निक व फार्मसी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

loading image
go to top