अक्कलकोट - अक्कलकोट शहरातील बहुचर्चित अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेस आज प्रारंभ करण्यात आला. नियोजित एसटी बसस्थानकाच्या पाठीमागील ६० अतिक्रमणधारकांचे ९१ गाळे आज काढण्यात आले. बहुतांश लोकांनी स्वतःहून अतिक्रमण काढल्याने प्रशासनाचे काम सोपे झाले..या परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवल्याने या परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. अभूतपूर्व अशी धाडसी कारवाई नगरपालिकेने केल्याने नागरिकांतून कौतुक करण्यात येत आहे. शहरातील प्रमुख रस्तेसुद्धा अतिक्रमण मुक्त होऊन मोकळा श्वास घेणार आहेत.आज सकाळपासून अक्कलकोट नगरपालिका, पोलीस खाते व महसूल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रचंड पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. एसटी बस स्थानकाच्या पाठीमागील सुमारे ९१ गाळे काढण्याच्या नोटिसा नगरपालिकेने दिलेल्या होत्या..त्यापैकी ४९ गाळेधारकांची मुदत ३१ जुलै २०२५ रोजी संपली होती तर दहा जणांची पाच ऑगस्ट तर एकाची आठ ऑगस्ट रोजी संपणार होती. मात्र सर्वच अतिक्रमणधारकांनी आजच स्वतःहून अतिक्रमण काढून घेतले. नगरपालिका प्रशासनाने जेसीबी व पोकलेनद्वारे दुकानासाठी करण्यात आलेल्या सर्व कठडे काढून टाकले. तसेच ज्यांनी अतिक्रमण काढले नाही त्यांचे दुकाने जेसीबीने उध्वस्त करण्यात आले..अतिक्रमण काढण्यासाठी २ पोकलेन,६ जेसीबी,१४ ट्रॅक्टर व ४ हायवा या वाहनांचा वापर करण्यात आला.या अतिक्रमण मोहिमेसाठी १० पोलीस अधिकारी,१०० पोलीस व जलद प्रतिसाद दल यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच नगरपालिकेचे ५५ सफाई कामगार व नगरपालिकेचे सर्व कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते.ही कारवाई करण्यासाठी अक्कलकोट नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, तहसीलदार विनायक मगर, अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे, पोलीस उपनिरीक्षक रणवरे, पवार, करपे, नगरपालिकेचे नगरअभियंता अमोल भामरे, सहाय्यक नगररचनाकार शुभम माहुरे, उपनगर अभियंता अभिषेक काकडे, रचना सहाय्यक उत्कर्ष उकरंडे, रचना सहाय्यक प्रदुम्न जाधव, विद्युत अभियंता धनंजय शेळके व कामगार प्रमुख धनराज कांबळे आदींनी या कारवाईत भाग घेतला..नगरपालिकेने आज केलेल्या कारवाईत अतिक्रमणधारकांनी कोणताही विरोध केला नाही. तसेच स्वतःहून अतिक्रमण काढून घेतले. मात्र विशिष्ट भागात घोळक्या घोळक्याने जमाव जमला होता मात्र प्रचंड पोलीस बंदोबस्तामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या अतिक्रमणधारकांनी नगरपालिकेच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.मात्र, जागेच्या मालकीबाबत कोणताही पुरावा न दिल्या गेल्यामुळे त्यांच्या विरोधात नगरपालिकेच्या बाजूने निकाल लागला. नगरपालिकेने त्यांना रीतसर अतिक्रमण काढण्याची नोटीस दिलेली होती. नोटीसची मुदत संपल्यावरसुद्धा अतिक्रमण काढण्यात न आल्याने नगरपालिकेने आजपासून अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे आज कारवाई करण्यात आली..१) यापूर्वी सुद्धा नगरपालिकेने रस्ता रुंदीकरण करताना श्रीराम मंदिराची भिंत बाधित होत होती. आमदार सचिन कल्याणशेट्टी, मुख्याधिकारी रमाकांत डाके व नगरपालिका प्रशासन, वटवृक्ष देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे व विश्वस्त यांच्या संमतीने सदर भिंत काढून आतमध्ये घेण्यात आलेली होती. शहराच्या विकासासाठी त्यावेळेस देवस्थानने प्रशासनाला सहकार्य केले होते.२) नवीन बसस्थानकाचे काम सुरू होत असताना काही लोकांनी बसस्थानकाच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती परंतु या बाबतीत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी लक्ष घातले. प्रशासनाने पुरावे सादर केल्याने एसटी बसस्थानकाची मोठी जागा शासनास मिळाली. आ. कल्याणशेट्टी यांच्यामुळे त्याठिकाणी अद्ययावत बसस्थानक उभे राहत आहे..बसस्थानकाच्या पाठीमागे पायवाट मागण्यावरून मोठे महाभारत घडले आहे. त्याचा फटका अजून बसणार आहे. या भागातील इतर अतिक्रमणसुद्धा लवकरच काढण्यात येणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिलेले आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.