Shivaji Sawant and Tanaji Sawant
sakal
माढा - माढा तालुक्याच्या, जिल्ह्याचे व राज्याच्या राजकारणामध्ये सक्रिय असलेल्या माढा तालुक्यातील वाकाव येथील सावंत परिवाराचे मनोमिलन झाले असून अपना अपना सावंत परिवार आत हमारा सावंत परिवार झाला आहे.
राजवी ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष प्रा. शिवाजी सावंत यांनी मूळ शिवसेनेच्या माध्यमातून प्रतिकूल परिस्थितीत राजकीय वाटचाल सुरू केली. स्वतःची व स्वतःच्या घराण्याची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना राजकारणातील एक प्रमुख घराणे म्हणून प्रा. शिवाजी सावंत यांच्या प्रयत्नामुळे सावंत कुटुंबाची ओळख निर्माण झाली. यावर माजी मंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी कळस चढवत राज्यात कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिले.