मूग, उडीद विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणीचे आवाहन 

moog
moog
Updated on

सोलापूर : मूग, उडीद यांच्या आधारभूत किंमती केंद्र शासनाने जाहीर केल्या असून उत्पादक शेतकऱ्यांनी महाराष्ट्र स्टेट को.ऑप. मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडने नेमलेल्या सबएजंट संस्थेमार्फत ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी भास्कर वाडेकर यांनी केले आहे.

जिल्ह्यात सोलापूर, अक्कलकोट, दुधनी, बार्शी, कुर्डूवाडी याठिकाणी 15 सप्टेंबरपासून ऑनलाईन नोंदणी सुरू केली आहे. शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी पीक पेरा नोंद असलेला सातबारा उतारा, आधारकार्ड, राष्ट्रीयकृत बॅंकेच्या पासबुकची झेरॉक्‍स (खाते क्रमांक आणि आयएफएससी कोडसह) सोबत घेऊन येणे आवश्‍यक आहे.

शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर खरेदी केंद्रावर माल कधी आणावा याचा नोंदणी केलेल्या मोबाईलवर एसएमएस येईल. त्यानंतरच शेतकऱ्यांनी वाळलेला, स्वच्छ व काडीकचरा विरहित माल खरेदी केंद्रावर आणावा. खरेदी केलेल्या मालाचे पैसे शेतकऱ्यांना बॅंक तपशिलाप्रमाणे एनईएमएल पोर्टलवरून परस्पर शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री. वाडेकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
The programme was organised by Priyadarshini Mahila Vikas Mandal to support pilgrims during the Ashadhi Wari.
Thousands of devotees are expected to participate in the religious celebrations, with special arrangements for devotees including community fasting meals.
TET Exam
Marathi News Esakal
www.esakal.com