दिग्विजय बागल ऍक्‍टिव्ह ! अडचणीतील बागल गटात पुन्हा उत्साह

दिग्विजय बागल ऍक्‍टिव्ह ! अडचणीतील बागल गटात पुन्हा उत्साह
Digvijay Bagal
Digvijay BagalCanva
Updated on

दिग्विजय बागलांच्या प्रत्येक गोष्टीची सोशल मीडियातून होणारी प्रसिद्धी या सर्व गोष्टींचा विचार करता, दिग्विजय हेच बागल गटाचे भविष्यकाळात नेतृत्व करतील, असे दिसू लागले आहे.

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्‍याच्या (Karmala) राजकारणात गेली 25 वर्षे बागल गटाचे महत्त्व आधोरेखित केले जाते. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) सर्व आलबेल चालले असताना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची साथ सोडत रश्‍मी बागल (Rashmi Bagal) यांनी शिवसेनेची (Shivsena) उमेदवारी घेत विधानसभा लढवली. मात्र त्या तिसऱ्या क्रमांकावर गेल्या. 2014 व 2019 च्या विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव, श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचे प्रकरण, श्री मकाई कारखान्यापुढे असलेल्या अडचणी या सर्व बाबींचा विचार करता आज बागल गट अडचणीत आहे. या परिस्थितीतही बागल गटाचे युवा नेते, मकाईचे अध्यक्ष दिग्विजय बागल (Digvijay Bagal) यांनी तालुक्‍यातील कार्यकर्त्यांच्या सुरू केलेल्या भेटीगाठीमुळे निष्ठावंत बागल गटातील कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येत आहे. (As Digvijay Bagal became active in politics, there are enthusiasm among the activists)

Digvijay Bagal
राष्ट्रवादीचा खरा चेहरा समोर आलाय - गोपीचंद पडळकर

एकेकाळी आमदारकी, पंचायत समिती, जिल्हा परिषद, अजिनाथ कारखाना, मकाई कारखाना या सर्व सत्ता एकहाती काबीज केलेला बागल गट आजमितीला बॅकफूटवर गेलेला दिसून येतो. मात्र अशाही परिस्थितीत मनोधैर्य खचू न देता बागल गटाचे युवा नेते दिग्विजय बागल यांनी बागल गटाची धुरा हाती घेत गावोगावी दौरे सुरू केले असून, बागल गटापासून दुरावलेल्या कार्यकर्त्यांना आपलेसे करत नवीन कार्यकर्त्यांना जोडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या प्रयत्नाला निश्‍चितच सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. दिग्विजय बागल हे गेल्या काही महिन्यांपासून करमाळा तालुक्‍यातील ग्रामीण भागात दौरे काढून वाड्या- वस्त्यांवर जाऊन लोकांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. लोकांनी मांडलेल्या समस्या सोडवण्यासाठी थेट मंत्रालयात महाविकास आघाडीच्या मंत्र्यांच्या भेटी घेऊन त्यांना निवेदन देऊन त्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मध्यंतरी त्यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील (Water Resources Minister Jayant Patil) यांची भेट घेऊन कुकडीचे पाणी सीना नदीच्या बंधाऱ्यात सोडण्यासंदर्भात केलेल्या मागणीचे लोकांनी कौतुक केले. बागल यांनी भेटीगाठी सुरू केल्याने दिग्विजय बागल यांच्या रूपाने एक नवी आशा कार्यकर्त्यांना वाटू लागली आहे. माजी राज्यमंत्री स्व. दिगंबरराव बागल यांना मानणारा वर्गही यामुळे समाधान दिसतोय.

Digvijay Bagal
महावितरणच्या रडावर शेतकरी ! थकबाकी न भरल्यास कनेक्‍शन तोड मोहीम

दिग्विजय यांच्याकडे बागल गटाचे नेतृत्व?

लोकांच्या भेटीगाठी, जुन्या-नव्याचा मेळ घालण्याचा प्रयत्न, वरिष्ठ पातळीवर नेत्यांचा वाढवलेला संपर्क, ठोस निर्णय घेण्याचा प्रयत्न आणि दिग्विजय बागल करत असलेल्या प्रत्येक गोष्टीची सोशल मीडियातून होणारी प्रसिद्धी या सर्व गोष्टींचा विचार करता, दिग्विजय बागल हेच बागल गटाचे भविष्यकाळात नेतृत्व करतील, असे दिसू लागले आहे. रश्‍मी बागल या देखील दिग्विजय बागल यांनाच नेतृत्व करण्यासाठी वाव देत असल्याचे जाणवत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com