"उजनी' काठावर शेतकऱ्यांची धांदल! पाइप, केबल, मोटारी काढण्यास सुरवात

"उजनी'च्या काठावर शेतकऱ्यांची धांदल! पाइप, केबल, मोटारी काढण्यास सुरवात
"उजनी'च्या काठावर शेतकऱ्यांची धांदल! पाइप, केबल, मोटारी काढण्यास सुरवात
"उजनी'च्या काठावर शेतकऱ्यांची धांदल! पाइप, केबल, मोटारी काढण्यास सुरवातCanva

उन्हाळ्यामध्ये मायनस 23 टक्‍क्‍यांवर गेलेला उजनी जलाशयाचा पाणीसाठा सध्या मायनसचा टप्पा पार करून प्लस 33.17 टक्‍क्‍यांवर गेला आहे.

केत्तूर (सोलापूर) : उन्हाळ्यामध्ये मायनस 23 टक्‍क्‍यांवर गेलेला उजनी जलाशयाचा पाणीसाठा सध्या मायनसचा टप्पा पार करून प्लस 33.17 टक्‍क्‍यांवर गेला आहे. 22 जुलै रोजी उजनी धरण (Ujani Dam) प्लसमध्ये येण्यास सुरवात झाली होती. तीन दिवसांत जलाशयात सरासरी 56 टक्के पाणीसाठा वाढला आहे. दरम्यान, उजनी जलाशयाच्या लाभक्षेत्रात पाण्यामध्ये वाढ होत असल्याने शेतकऱ्यांची पाइप, केबल, मोटारी पाण्यापासून दूर घेण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. (As the water level of Ujani dam increased, farmers started removing pipes and motors-ssd73)

"उजनी'च्या काठावर शेतकऱ्यांची धांदल! पाइप, केबल, मोटारी काढण्यास सुरवात
सोलापुरात 360 संशयितांमधून 92 जणांना डेंगी !

पुणे जिल्हा (Pune District) परिसर, भीमा खोऱ्यात व धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून दमदार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे. या पावसाच्या हजेरीमुळे डोंगर भागातून खालच्या बाजूने वाहणाऱ्या ओढे- नाल्यांच्या माध्यमातून येणाऱ्या पाण्यामुळे इंद्रायणी, भीमा, मुळा मुठा या नद्या भरून वाहू लागल्याने उजनी जलाशयाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. दौंड येथून सरासरी 17 हजार 996 हजार क्‍युसेक तर बंडगार्डन येथून 13 हजार 830 हजार क्‍युसेक एवढा पाण्याचा विसर्ग धरणामध्ये येत आहे. पावसाळ्याच्या जून, जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत पाण्याची पातळी कमी होऊन उजनी धरण मायनस 23 टक्‍क्‍यांवर गेले होते.

"उजनी'च्या काठावर शेतकऱ्यांची धांदल! पाइप, केबल, मोटारी काढण्यास सुरवात
कोरोना ग्राफ ! पहिल्या लाटेत 1844 तर दुसऱ्या लाटेत 2669 बळी

पावसाळ्याच्या दोन महिन्यांत भीमा खोरे, डोंगर भागात व धरण क्षेत्रात दमदार पावसाने हजेरी न लावल्याने लाभक्षेत्रातील शेतकरी चिंता व्यक्त केली होती. मात्र, गेल्या चार- पाच दिवसांत या भागात पावसाने दमदार हजेरी लावल्याने खाली वाहणाऱ्या भीमा नदीच्या (Bhima River) पाणी पातळीत वाढ होत आहे. दरम्यान, उजनी मायनसमध्ये गेल्याने जलाशय परिसरातील शेतकऱ्यांनी पाइप जलाशयापर्यंत नेऊन पाण्याचा उपसा शेतीसाठी करत होते. मात्र आता उजनी धरण प्लसमध्ये येत असल्याने व उजनी जलाशयाच्या लाभक्षेत्रात पाण्यामध्ये वाढ होत असल्याने शेतकऱ्यांची पाइप, केबल, मोटारी पाण्यापासून दूर घेण्यासाठी धांदल सुरू झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com