निधी, विकास योजनेची घोषणा न करण्याच्या अटीवर मुख्यमंत्र्यांना महापुजेसाठी परवानगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ashadi ekadashi 2022 Permission for Mahapuja to CM eknath shinde on condition of not announcing funds and development plan solapur

निधी, विकास योजनेची घोषणा न करण्याच्या अटीवर मुख्यमंत्र्यांना महापुजेसाठी परवानगी

सोलापूर : आषाढी एकादशीच्या तोंडावर राज्यातील नगरपलिका निवडणुका जाहीर होत अचारसंहिता लागू झाल्याने मुख्यमंत्र्यांच्या महापूजेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र कोणत्याही योजना, विकास निधी यांची घोषणा न करण्याच्या अटीवर निवडणूक आयोगाने महामंत्र्यांच्या हस्ते महापूजा करण्यास परवानगी दिली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानाच्यादिवशी (ता. २१ जून) राज्यात राजकीय भूकंपास प्रारंभ झाला. सरकार बदलण्याची चिन्हे पालखी सोहळ्याच्या प्रस्थानांपासून सुरू झाल्याने श्रीविठ्ठलाची महापूजा कोणाच्या हस्ते होणार असा प्रश्ना निर्माण झाला होता.

अशातच शपथविधीनंतर या प्रश्नावर पडदा पडलेला असताना राज्यातील ९२ नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्याने आचारसंहिता सुरू झाली यामुळे आता मुख्यमंत्र्याच्या हस्ते महापूजा होणार का असा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत जिल्हधिकारी मिलिंद शंभरकर यांनी निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार केला होता. निवडणूक आयोगाने मुख्यमंत्र्याच्या दौऱ्याला हिरवा कंदील दाखवला असून कोणतीही योजना किंवा निधीची घोषणा न करता मुख्यमंत्र्यांना श्रीविठ्ठलाची महापूजा करता येणार आहे. तसेच या कार्यक्रमासाठी आवश्यक त्या परवानग्या घेण्याची अट घातली आहे. कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यासही हरकत नाही मात्र, त्याठिकाणीही कोणतीही घोषणा करता येणार नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्र्याच्या पूर्व नियोजित दौऱ्यात कोणाताही फरक झालेला नाही. राज्यात नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्याने आचारसंहिता सुरू असली तरी निवडणूक आयोगाने काही अटी घालून महापूजेला परवानगी दिली आहे. त्यामुळे प्रथेप्रमाणे महापूजा होईल.

- संजीव जाधव, अप्पर जिल्हाधिकारी, सोलापूर

Web Title: Ashadhi Ekadashi 2022 Permission For Mahapuja To Cm Eknath Shinde On Condition Of Not Announcing Funds And Development Plan Solapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..