

Thousands of devotees are expected to participate in the religious celebrations, with special arrangements for devotees including community fasting meals.
Sakal
माढा : आषाढी एकादशीच्या मंगलमय पर्वानिमित्त माढा येथील कसबा पेठेतील ऐतिहासिक श्री विठ्ठल मंदिर भक्तिरसाने न्हाऊन निघणार असून शनिवारी (ता. २५) पहाटे चार वाजता श्री विठ्ठल-रुक्मिणीची विधिवत महापूजा होणार आहे. पहाटेच्या काकड आरतीपासून सुरू होणाऱ्या या सोहळ्यात विठ्ठलनामाच्या गजरात भाविकांना भक्तीचा अनोखा अनुभव घेता येणार आहे.