Ashadhi Ekadashi 2023 : पंढरी भक्तीरसात चिंब, जमला लाखो वैष्णवांचा मेळा

आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी दहा लाखाहून अधिक भाविकांची पंढरीत गर्दी झाली आहे.
Pandharpur
Pandharpursakal

पंढरपूर - आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी दहा लाखाहून अधिक भाविकांची पंढरीत गर्दी झाली आहे. विठुरायाच्या भेटीची आस मनामध्ये बाळगून आळंदी आणि देहूवरून पायी चालत निघालेल्या ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबांच्या पालख्यांनी बुधवारी (ता.२८) सायंकाळी पंढरीत प्रवेश केला.

दरम्यान आषाढी दशमी दिवशी पहाटेपासूनच चंद्रभागा नदीमध्ये स्नानाची पर्वणी साधण्यासाठी लाखो भाविकांनी चंद्रभागा तिरी गर्दी केली होती. श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग गोपाळपूर रस्त्याच्याही पुढे गेली होती. श्री विठ्ठलाच्या पददर्शनासाठी आज वीस तास तर मुखदर्शनासाठी चार ते पाच तास लागत होते.

विठ्ठल विठ्ठल गजरी । अवघी दुमदुमली पंढरी॥ आषाढी यात्रेला आलेल्या लाखो भाविकांच्या विठ्ठल नामाच्या जयघोषाने अवघी पंढरी नगरी दुमदुमून गेली आहे.

आषाढी यात्रेला येणाऱ्या प्रत्येक भाविकाला ज्याप्रमाणे विठुरायाच्या दर्शनाची आस लागलेली असते त्याचप्रमाणे चंद्रभागेमधील स्नानाची देखील ओढ असते. त्यामुळेच बुधवारी दशमीच्या दिवशी चंद्रभागेत स्नान करण्यासाठी चंद्रभागा तिरी भाविकांचा अथांग जनसागर लोटला होता.

आषाढी यात्रेकरिता उजनी धरणातून पाणी सोडल्यामुळे चंद्रभागा नदीत यंदा मुबलक पाणी आहे. त्यामुळे भाविकांनी चंद्रभागा स्नानाचा आनंद मनसोक्त लुटला. महिला भाविकांना कपडे बदलण्यासाठी प्रशासनाने चंद्रभागा वाळवंटामध्ये सहा ठिकाणी चेंजिंग रूम उभारल्या आहेत.

याशिवाय वाळवंटामध्ये तीन ठिकाणी आपला दवाखान्याच्या माध्यमातून भाविकांसाठी वैद्यकीय उपचाराची सेवा उपलब्ध करून दिली आहे. महाद्वार घाटावरून स्नानासाठी नदीपात्रामध्ये येजा करणाऱ्या भाविकांच्या अलोट गर्दीवर नियंत्रण करावे याकरिता पोलीस प्रशासनाच्या वतीने यंदा प्रथमच लोखंडी बॅरिकेटच्या सहाय्याने स्वतंत्र मार्गिका तयार करण्यात आली आहे.

स्नान करताना नदीपात्रामध्ये कोणी बुडू नये याकरिता जीवरक्षक दल तैनात करण्यात आले आहे. दरम्यान आज श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग गोपाळपूर रस्त्याच्याही पुढे गेली होती. श्री विठ्ठल मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आलेले राहुल संजयराव पाटील (रा. रोहना, ता. आर्वी, जि. वर्धा)' सकाळ' शी संवाद साधताना म्हणाले, मंगळवारी दुपारी बारा वाजता गोपाळपूर रस्त्यावरील दर्शन रांगेमध्ये उभे होतो.

सुमारे वीस तासानंतर बुधवारी सकाळी आठ वाजता श्री विठ्ठलाचे पददर्शन झाले. श्री विठ्ठलाचे दर्शन झाल्याने पायी चालत आल्याचा सर्व शिणवटा निघून गेला. तर आज मुखदर्शनाची रांग संत तुकाराम भवनच्या पाठीमागे बाजूने तानाजी चौकातील प्रदक्षिणा रस्त्यावरून कालिका देवी चौकाच्या पुढे परिचारक वाड्यापर्यंत गेली होती. श्री विठ्ठलाच्या मुखदर्शनासाठी चार ते पाच तास लागत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com