पालखी मार्गावरील कामे १० जूनपर्यंत पूर्ण करावीत - सचिन इथापे

भंडीशेगाव येथे चौरंगीनाथ महाराज पालखी तळाचे सपाटीकरण केले पाहिजे.
ashadhi wari 2024 palkhi highway work till 10th june sachin ithape
ashadhi wari 2024 palkhi highway work till 10th june sachin ithapeSakal

पंढरपूर : आषाढी यात्रेवेळी पायी पालखी सोहळ्याबरोबर येणाऱ्या वारकरी भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने पालखी महामार्गावरील सेवा रस्त्याची दुरुस्ती, महामार्गावरील रस्त्यावरून पालखी सोहळ्यास पालखी तळाकडे जाण्यायेण्यासाठी आवश्यक कामे १० जून पर्यंत पूर्ण करावीत अशा सूचना प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिल्या.

येथील प्रांताधिकारी कार्यालयात आषाढी यात्रा पूर्व नियोजनाबाबत आज बैठक घेण्यात आली. या बैठकीस उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, तहसीलदार सचिन लंगुटे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश सुडके,

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, उपकार्यकारी अभियंता भीमाशंकर मेटकरी, नायब तहसीलदार मनोज श्रोत्री, उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर, मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, महावितरणचे श्री. भोळे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

प्रांताधिकारी श्री. इथापे म्हणाले, पालखी महामार्गावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून वाखरी पालखी तळालगत नवीन रस्त्याचे काम सुरू असून या ठिकाणी रस्त्यांची उंची वाढविण्यात आल्याने पालखी तळावर पालखी सोहळ्यास जाण्यासाठी व येण्यासाठी योग्य प्रमाणात उतार करण्याची गरज आहे.

भंडीशेगाव येथे चौरंगीनाथ महाराज पालखी तळाचे सपाटीकरण केले पाहिजे. पालखी मार्गावरील पाण्याच्या स्त्रोताची ठिकाणे निश्चित करून पाणी भरण्यासाठी जाणाऱ्या टँकरला अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेवून तत्काळ नियोजन करावे.

मंदिर समितीने भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी नियोजन करावे. आषाढी यात्रा कालावधीत ६५ एकर येथे येणाऱ्या दिड्यांची व भाविकांची संख्या विचारात घेता प्लॉट वाटपसह आवश्यक सुविधांचे नियोजन करावे.

महावितरने पाणीस्त्रोताच्या ठिकाणी अखंडित वीजपुरवठा उपलब्ध ठेवावा. पालखी तळांवर तसेच शहरातील विद्युत दुरुस्तीचे कामे तत्काळ सुरु करा. वारकरी भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिस प्रशासनाच्या सूचनेनुसार मंदिर समिती व नगर पालिकेने अधिकचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. आवश्यक ठिकाणी वाहन तळाचे मुरमीकरण करावे. जलसंपदा विभागाने कुंभार घाटाची तत्काळ दुरुस्ती करावी, अशा सूचनाही प्रांताधिकारी श्री. इथापे यांनी दिल्या.

भाविकांच्या सुरक्षा, वाहतूक व्यवस्था महत्त्वाची

यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. भोसले म्हणाले, आषाढी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांच्या सुरक्षेबरोबरच, वाहतूक व्यवस्था देखील महत्त्वाची आहे. यासाठी एसटी महामंडळाने एसटी निश्चित केलेल्या वाहनतळाच्या ठिकाणीच पार्किंग कराव्यात. वारी कालावधीत पाऊस असल्याने पार्किंगच्या ठिकाणी मुरमीकरण करावे.

एस.टी रस्त्याच्या कडेला लागणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. पंढरपुरात येणाऱ्या भाविकांसाठी उपलब्ध सुविधांचे तसेच ठिकाणांची माहितीसाठी कायमस्वरूपी माहिती फलक लावावेत. पत्राशेडमध्ये कुठल्याही स्टॉलला परवानगी देऊ नये. भीमा नदी पात्रावरील दगडी पुलाच्या साइड रोलिंगचे काम करावे. अहिल्या पुलावर पुरेशी प्रकाश व्यवस्था नसल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण होत असल्याने त्या ठिकाणी प्रखर प्रकाश व्यवस्था करण्यात यावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com