Guide Maps in Mohol
sakal
मोहोळ - आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची वारी सुखकर व्हावी या पार्श्वभूमीवर मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच ठिकाणी 'मार्गदर्शक पोलीस पॉईंट' तैनात केले असून, प्रत्येक पॉईंट वर दोन पोलीस कर्मचारी व दोन होमगार्ड यांच्यासह मार्गदर्शक नकाशे लावण्यात आल्याची माहिती मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी दिली. दरम्यान पंढरपूर कडे जाणारी जड वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.