

Solapur
esakal
पंढरपूर: आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो वारकरी व भाविकांना कमी वेळेत, सुलभ दर्शन मिळावे यासाठी १० जुलैपासून व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात येणार असून, मंदिर परिसरात ‘नो व्हेईकल झोन’ लागू केला जाणार आहे. ही माहिती राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.