
सकाळ वृत्तसेवा
मोहोळ : मोहोळ तालुक्यातील ऐतिहासिक अशा "आष्टी" तलावात गेल्या पंधरा दिवसापासून पडत असलेल्या पावसाने ५८ टक्के पाणी साठा झाला आहे. मात्र आष्टी तलावातील पाणीसाठा १०० टक्के होण्यासाठीची सर्व भिस्त आता माढा तालुक्यातील काही गावात पडणाऱ्या पावसावर आहे.