

Former MLA Rajan Patil — Driving the Ashti Lift Irrigation Project Phase 3 for 3,900 hectares of farmland
मोहोळ : मोहोळ तालुक्यातील अनगर व परिसरातील 10 गावातील शेतकऱ्यांच्या जीवनात हरितक्रांती घडविणाऱ्या आष्टी उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक-3 (अनगर व दहा गावे पाणीपुरवठा योजना) या योजनेच्या आरंभ प्रक्रियेस सुरुवात झाली असून, नुकतेच 117 कोटी 76 लाख रुपयांची प्राथमिक स्वरूपाची निविदा निर्णय प्रक्रियेत आली आहे. येत्या 25 तारखेस ही निविदा उघडली जाणार आहे. या योजने मुळे अनगर व परिसरातील दहा गावांचे 3 हजार 900 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याची माहिती माजी आमदार राजन पाटील यांनी दिली.