
मोहोळ - सोलापूर, जिल्हा मोहोळ तालुक्यातील सामान्य कुटुंबातील छोट्याशा खंडोबाचीवाडीतील कु. अश्विनी आप्पासाहेब शिंदे हिची नवी दिल्ली येथे होणाऱ्या खो-खो वर्ल्ड कपसाठी अंतिम महिला संघात निवड झाली. तिच्या या निवडीमुळे खंडोबाचीवाडीसह परिसरात ग्रामस्थांनी पेढे वाटून आनदोस्तव साजरा केला.