
सोलापूर : स्टँडअप कॉमेडियन प्रणीत मोरेला सोलापुरातील एका कार्यक्रमात स्काय फोर्स फेम अभिनेता वीर पहाडिया यांच्यावर विनोद केल्यामुळे दहा ते ११ जणांच्या गटाने मारहाण केल्याची पोस्ट प्रणीत मोरेने आपल्या सोशल मीडिया हँडलवर टाकली होती. या प्रकरणी हॉटेल व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून सदर बाजार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पाचजणांना ताब्यात घेतले.