तिप्पट कर वाढलेल्या मिळकतींना नोटिसा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Notice to triple taxed income

सोलापूर :तिप्पट कर वाढलेल्या मिळकतींना नोटिसा

सोलापूर : सोलापूर महापालिका कर आकारणी विभागाकडून मिळकतींचे रिव्हिजन सुरू आहे. आतापर्यंतच्या रिव्हिजनमध्ये सहा हजार मिळकती वाढीव बांधकाम व व्यावसायिक वापर होत असल्याचे आढळले आहेत. या मिळकतींच्या करामध्ये तिपटीने वाढ झाली आहे. अशा मिळकतींना नाेटिसा काढण्यात येत असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार यांनी दिली.

महापालिका कर विभागाने गेल्या सहा महिन्यांपासून थकबाकी वसुली मोहीम राबवून चालू आणि मागील थकबाकी अशी साधारण १३५ कोटी रुपयांची वसुली केली आहे. ७० ते १ लाखापर्यंतच्या ९ हजार ९०० थकबाकीदारांची प्रकरणे लोकअदालतीमध्ये सुनावणीसाठी ठेवली होती. त्यानंतर बड्या थकबाकीदारांच्या खुल्या व बांधलेल्या जागांची जप्ती कारवाई सुरू केली. या कारवाई मोहिमेंतर्गत बहुतांश थकबाकीदारांनी कर भरणा केली आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षातील नवीन बिले तयार करण्यात येत आहेत.

मागील थकबाकीदारांची यादीदेखील भरणा झाले अथवा नाही, याची चाचपणी करून यादी अद्ययावत करून पुढील मोहीम हाती घेण्यात येणार आहे. कर प्रणालीमध्ये एकसूत्रीपणा आणण्यासाठी शहरात मिळकतींचे रिव्हिजन सुरू आहे. या रिव्हिजननुसार आतापर्यंत सहा हजार मिळकतींच्या करामध्ये तिप्पट वाढ झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. या सहा हजार मिळकतींना नोटिसा देण्यासाठी पेठनिहाय काम सुरू आहे. तसेच रिव्हिजनचे देखील काम सुरू आहे. जसे नव्याने वाढीव मिळकती आढळतील तशी कार्यवाही होत राहणार असल्याचेही सहाय्यक आयुक्त पवार यांनी सांगितले.

व्यवसाय मांडलाय तर कर भरावाच लागेल शहरातील मंदिर, मस्जिद आणि चर्च आदी धार्मिक स्थळांची स्वतंत्र माहिती उपलब्ध नाही. मंदिर असो की इतर कोणतेही धार्मिक स्थळ पूजेची जागा वगळता मंदिर परिसरात व्यावसायिक वापर होत असल्यास त्याचा कर भरावाच लागेल. मंदिर परिसरात व्यवसाय कोणता आहे, उत्पन्न किती मिळतो याचा कोणताही विचार न करता अधिनियम १३२ क नुसार धार्मिक स्थळांना नियमानुसार कर आकारणी करण्यात येईल. तिप्पट भाडे वाढलेल्या ज्या मिळकतींना नोटिसा दिल्या आहेत, त्यामध्ये धार्मिक स्थळांनाचा देखील समावेश आहे. वाढीव बिलाबाबत संबंधित मिळकतदारांना हरकतींसाठी २१ दिवसांची मुदत दिली आहे,असेही सहाय्यक आयुक्त पवार म्हणाले.

Web Title: Assistant Commissioner Information Notice Triple Taxed Income Notice To Property

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top