
Solapur News : कर्तव्यावर असलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा ह्रदय विकाराने मृत्यु
कामती : येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने रविवारी( ता.8) रोजी दुपारी दोन वाजता मृत्यू झाला. बबलू नाईकवाडी (वय. 55 रा. सोलापूर) असे मृत उपनिरीक्षकाचे नाव आहे.
रविवारी दुपारी कामती पोलीस ठाण्यात सही करून ते आपले कर्तव्य बजावण्या साठी कुरूल या गावी गेले असता त्यांना श्वसनाचा खूप त्रास होऊ लागला. दम लागून घाम येऊ लागल्यामुळे ते स्वतः कार चालवत कामती येथे आले.
त्यांनी गावातील एका मेडिकल दुकानातून कांही औषधे घेऊन कार ने कामती गावातून जात असताना त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला, गाडी मध्येच त्यांचा मृत्यू झाला. त्यांना त्यांच्या पोलीस सहकाऱ्यांनी कामती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पोलीस उपनिरीक्षक नाईकवाडी आपल्या सरळ कामे आणि मनमिळावू स्वभावामुळे पोलीस खात्यात सर्व परिचित होते. या घटनेनंतर पोलीस खात्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.