पुजाऱ्यास गळफास देऊन ठार मारण्याचा प्रयत्न! भंडारकवठेतील सात जणांविरुद्ध गुन्हा

भंडारकवठे येथे पुजाऱ्यास गळफास देऊन ठार मारण्याचा प्रयत्न
जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्यासह 28 जणांविरुद्ध गुन्हा
जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्यासह 28 जणांविरुद्ध गुन्हा
Updated on

दक्षिण सोलापूर : महासिद्ध देवाच्या पूजेस बेलपत्री आणण्यास गेलेल्या पुजाऱ्यास मारहाण करत गळफास देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भंडारकवठे (ता. दक्षिण सोलापूर) येथील सात जणांविरुद्ध मंद्रूप पोलिसांत शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी पिरप्पा आमसिद्ध फुलारी (वय 56) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, महासिद्ध देवाला मिळणारे दान व दक्षिणा मलाही देण्याची मागणी मी सहा महिन्यांपूर्वी महासिद्ध पुजारी यांच्याकडे केली होती. मात्र त्यांनी त्यांच्या लोकांसमोर दहा लाख रुपये गेले तरी हरकत नाही पण याला सोडू नका, अशी धमकी दिली होती.

13 एप्रिल रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास मी माझ्या दुचाकीवरून (एम. एच. 13 बी. डी. 5563) आंबेडकरनगर रस्त्याने बेलपत्री आणण्यास गेलो. परत मंदिराकडे येत असताना वाटेत मला महासिद्ध संगप्पा पुजारी, गौरप्पा सुरेश पुजारी, आमसिद्ध सुलतान पुजारी, आमसिद्ध सोमण्णा पुजारी हंजगी, आमसिद्ध गुंडू अजावडरे (सर्व रा. भंडारकवठे) व इतर दोन अनोळखी व्यक्तींनी अडवले. गाडीवरून खाली पाडून सर्वांनी मारहाण केली. गौरप्पा पुजारी यांनी डोक्‍यात दगडाने मारले. आमसिद्ध पुजारी हंजगी यांनी आम्ही देवाचे सोने चोरतो म्हणून गावात सांगतोस का? असे म्हणून बेलपत्री बांधलेल्या जोडीने मला गळफास दिला. त्यामुळे मी बेशुद्ध पडलो. बेशुद्ध असल्याने माझ्यावर उपचार चालू होते. शुद्धीवर आल्याने शुक्रवारी मी वरील सर्वांनी माझा जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद दिली.

या फिर्यादीनुसार सात जणांविरुद्ध पिरप्पा फुलारी यास ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी मंद्रूप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन थेटे करीत आहेत.

बातमीदार : श्‍याम जोशी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

solapur-pune highway
solapur
solapur issues of voters
farmer loan waiver scheme issue
Marathi News Esakal
www.esakal.com