तुमचं नाव 'प्रणिती' आहे? असेल तर सोने पे सुहागाच!

तुमचं नाव 'प्रणिती' आहे? असेल तर तुम्हाला मिळणार...!
Praniti Shinde
Praniti Shindeesakal
Updated on
Summary

यशदा युवती फाउंडेशनच्या माध्यमातून आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम राबवण्यात येत आहे.

सोलापूर : तुमचे नाव 'प्रणिती' (Praniti) आहे का? असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तसेच तुमचे नाव 'प्रणिती सुशीलकुमार शिंदे' (Praniti Sushilkumar Shinde) असेल तर सोने पे सुहागाच आहे! कारण यशदा युवती फाउंडेशनच्या (Yashada Yuvati Foundation) माध्यमातून आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्या वाढदिवसानिमित्त 'प्रणिती सुशीलकुमार शिंदे' नाव असणाऱ्यांना सोन्याची नथ तर फक्त 'प्रणिती" नावाच्या महिला व युवतींना आकर्षक पैठणी देऊन त्यांचा सन्मान 9 डिसेंबर रोजी गुरुनानक चौक येथील प्रणिती उद्यानात करण्यात येणार असल्याची माहिती नगरसेविका फिरदोस पटेल (Firdaus Patel) यांनी दिली.

Praniti Shinde
कोठे, शेख, चंदनशिवेंचे 'या'वेळी पक्षांतर! कॉंग्रेसचे बेरियाही...

यापूर्वी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेविका फिरदोस पटेल यांनी मोफत पेट्रोल उपक्रम राबवला होता. त्यावेळी तब्बल 787 जणांनी याचा लाभ घेतला होता. शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी सलग तीन वेळा विजयी पताका फडकावली आहे. गोरगरीब व सामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून आमदार प्रणिती शिंदे यांनी केलेल्या विकासकामांमुळे या मतदारसंघातील तळागाळातील व उच्चशिक्षित मतदारांनी सलग तीन वर्षे आमदार शिंदे यांना निवडून दिले आहे.

Praniti Shinde
CET परीक्षा : जातपडताळणीची मूळ प्रमाणपत्रे सादर करण्यास मुदतवाढ

या विकासकामांचा लेखाजोखा व कृतज्ञता व्यक्त करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून व आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 'प्रणिती सुशीलकुमार शिंदे" नाव असणाऱ्यांना सोन्याची नथ आणि 'प्रणिती" नाव असणाऱ्या महिला व युवतींना आकर्षक पैठणी देऊन त्यांचा सन्मान करण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी महिला व युवतींनी नावाचा पुरावा म्हणून आधारकार्ड आणि रेशन कार्ड सोबत आणणे गरजेचे असल्याचे नगरसेविका फिरदोस पटेल यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shaktipeeth Highway Protest raju shetti in solapur
Devotees Shocked in Pandharpur After Claims of Paid Vithal Darshan Surface
Cattle Transport Truck Meets With Accident in Solapur’s Mohol Taluka
ATM Pulled Out and Fled in Car; Major Theft Incident Shocks Solapur
Marathi News Esakal
www.esakal.com