तापमान नियंत्रित करण्यासाठी डॉ. कदम यांनी आपल्या चारचाकी गाडीला शेणाचा लेप देवून तापमान नियंत्रित ठेवण्याचा आगळावेगळा प्रयोग केला आहे.
पंढरपूर : आलिशान चारचाकी गाडीतील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी पंढरपूर येथील एका आयुर्वेदिक डाॅक्टरने (Ayurvedic Doctor) नामी युक्ती केली आहे. देशी गाईचे शेण आणि गोमूत्राचा लेप गाडीला दिला आहे. यामुळे गाडीतील तापमान 50 टक्क्यांनी नियंत्रित झाल्याचा दावा केला आहे. शेणाने लेपन केलेल्या आलिशान चारचाकी गाडीची सध्या पंढरपुरात (Pandharpur) जोरदार चर्चा सुरु आहे.