
सोलापूर : युद्ध करण्यासाठी प्रहारचे कार्यकर्त्यांना आम्ही सीमेवर पाठवायला तयार आहोत. पाकिस्तानला भारतात विलीन करून घ्या. ज्या प्रकारे तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७१ साली पाकिस्तान देशातून बांगलादेशाची निर्मिती केली होती. तशीच कारवाई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करावी, अशी अपेक्षा प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख माजी आमदार बच्चू कडू यांनी आज सोलापुरात व्यक्त केली.