Barshi C-Section Case: सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू बार्शी शहरातील डॉक्टराविरोधात गुन्हा दाखल; निष्काळजीपणा केल्याचा आरोप

Medical Negligence Case Registered in Barshi: वैद्यकीय चौकशी समितीच्या अहवालानंतर डॉ. रविकिरण भोसले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपचारातील निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला आहे.
Barshi C-Section Case

Barshi C-Section Case

esakal

Updated on

बार्शी: बार्शीतील बगले चाळ येथील सोनम उमेश महानवर यांचा प्रसूतीदरम्यान झालेल्या सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पती उमेश हरीभाऊ महानवर यांनी डॉ. रविकिरण भोसले यांच्याविरोधात बार्शी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे पत्नीचा मृत्यू झाल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com