Barshi Crime : तरुणास मारहाण प्रकरणी माजी नगरसेवकासह नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

तरुणास माजी नगरसेवकासह नऊ जणांनी तलवार, लाकडी बॅट, दांडके, रॉडने हल्ला करुन जखमी केले.
Beating
Beatingesakal
Updated on
Summary

तरुणास माजी नगरसेवकासह नऊ जणांनी तलवार, लाकडी बॅट, दांडके, रॉडने हल्ला करुन जखमी केले.

बार्शी - शहरातील तुळजापूर रस्त्यावर असलेल्या कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कमानीसमोरुन बसस्थानकाकडे जात असताना तरुणास माजी नगरसेवकासह नऊ जणांनी तलवार, लाकडी बॅट, दांडके, रॉडने हल्ला करुन जखमी केले. तर चेन, अंगठी, रोख वीस हजार रुपयांचा ऐवज लुटल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Beating
Mortgage Home : म्हातारपणी रिव्हर्स मॉरगेजने घरच देईल जगण्याचा आधार, कसे ते घ्या जाणून

माजी नगरसेवक रोहित लाकाळ, विजय साठे, दीपकराज कदम, सुमित कावळे, बालाजी पवार, वैभव म्हेत्रे, प्रसाद शेळके यांचेसह अन्य अनोळखी दोघे जण अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. जखमी संजय आरगडे (रा. तावडी, ता. बार्शी) यांनी फिर्याद दाखल केली. ही घटना ३ मार्च रोजी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान घडली.

माझ्यासह सतीष आरगडे आम्ही बसस्थानकाकडे जात असताना तू परवा सूरज आरगडे याचे भांडण का मिटवले याचा राग मनात धरुन शिवीगाळ करीत धमकी देऊन,डोक्यात तलवार मारुन जखमी केले असून, खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

यावेळी दोन तोळ्याची चेन, एक तोळ्याची अंगठी तसेच रोख २० हजार रुपये काढून घेतले असे फिर्यादीत म्हटले आहे तपास पोलिस उपनिरीक्षक गजानन कर्णेवाड करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com