
बार्शी/पांगरी/मळेगाव : बार्शी तालुक्यातील पांगरी, मळेगाव, हिंगणी, बोरगाव, झाडी, उपळे, महागाव, पिंपळगाव, जामगाव, कापशी परिसरात गुरुवारी सायंकाळी वादळ आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. जवळपास अर्धा तास कोसळलेल्या या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कांदा पिकांसह ज्वारी, गहू, हरभरा, आंबा, द्राक्ष या पिकांना मोठा फटका बसला आहे. या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी शेतकऱ्यांमध्ये मात्र चिंता वाढली आहे.