
बार्शी : शहरातील मोहित अलंकार या सराफी दुकानातील सोन्याचे दागिने बनविण्यासाठी तसेच दुरुस्तीसाठी सोन्याची लगड कारागिरास देण्यात आली होती. त्याने सुमारे ३८ लाख ४० हजार रुपयांचे दागिने विकून जुगारामध्ये पैसे उडविल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात कारागिराविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.