Solapur Malvandi clash during Khandoba temple event; two injured after group fight
सोलापूर
Solapur News : चंपाषष्टी उत्सवातच कलह; मालवंडीत दोन गटात मारहाण; दहा जणांविरोधात गुन्हा!
Barshi TempleClash : मालवंडी येथील खंडोबा मंदिरात चंपाषष्टी कार्यक्रमादरम्यान छेडछाडीवरून दोन गटात हाणामारी झाली. घटनेत दोघे जखमी असून दोन्ही गटांनी परस्परविरोधी गुन्हे बार्शी पोलिसांकडे दाखल केले आहेत.
बार्शी : मालवंडी(ता.बार्शी)येथे खंडोबा मंदिरात नवरात्र महोत्सव समारोप प्रसंगी चंपाषष्टीनिमित्त रात्री उशिरापर्यंत वाघ्या-मुरळीचा कार्यक्रम सुरु असताना मंदिरात दर्शनासाठी दोन्ही कुटुंबातील आले असताना मंदिर परिसरात छेडछाडीच्या कारणावरुन दोन गटात हाणामारी झाली असून कार्यक्रम सुरु असल्याने ओरडण्याचा आवाज ऐकू आला नाही,हाणामारीत दोन जण जखमी झाले असून त्यांचेवर शहरात खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत दोन्ही गटांनी परस्पर विरोधात बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.
