esakal | बार्शीकरांनो, कोरोनाची साखळी तोडा : पालकमंत्री भरणे

बोलून बातमी शोधा

Guardian minister dattratray bharane

बार्शी तालुक्‍यात 1 हजार 87 ऍक्‍टिव्ह रुग्ण असून 413 जण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. 684 जणांवर कोविड सेंटर, कोविड रुग्णालय येथे उपचार सुरु आहेत तर 271 जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

बार्शीकरांनो, कोरोनाची साखळी तोडा : पालकमंत्री भरणे
sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

बार्शी (सोलापूर) : बार्शी शहर अन्‌ तालुक्‍यात कोरोना रुग्णांची संख्या मोठी असून राजकारणाची ही वेळ नसून या संकटामध्ये सर्वजण एकत्र येऊन मुकाबला करायचा आहे. डॉक्‍टर, प्रशासकीय अधिकारी यशस्वीपणे कार्य करीत आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी बार्शीकरांनी मदत करायची आहे, असे आवाहन पालकमंत्री दत्रात्रय भरणे यांनी केले.

नगरपरिषदेच्या कर्मवीर जगदाळे मामा सभागृहात अधिकाऱ्यांची बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार राजेंद्र राऊत, खासदार ओमराजे निंबाळकर, माजीमंत्री दिलीप सोपल, नगराध्यक्ष असिफ तांबोळी, प्रांताधिकारी हेमंत निकम, मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील उपस्थित होते. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची आचारसंहिता सुरु असल्याने दौरा बंद होता. संपताच जिल्ह्यात दौरा करुन माहिती घेत आहे. तरीही लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी यांच्या संपर्कात राहून माहिती घेत होतो. बार्शी तालुक्‍यात 1 हजार 87 ऍक्‍टिव्ह रुग्ण असून 413 जण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. 684 जणांवर कोविड सेंटर, कोविड रुग्णालय येथे उपचार सुरु आहेत तर 271 जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

शहरात 505 बेडची क्षमता असून 262 ऑक्‍सिजन बेड आहेत तर 14 व्हेन्टिलेटर आहेत. ऑक्‍सिजन व रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन यापुढे कमी पडणार नाही, याची दक्षता घेत असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची बुधवारी कंपनीच्या मालकांसोबत बैठक झाली, असेही ते म्हणाले. दरम्यान, पालकमंत्री भरणे नगरपरिषदेच्या प्रवेशद्वाराजवळ येताच बालाजी डोईफोडे व आप्पा पवार यांनी काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी करत निषेध केला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.

बातमीदार : प्रशांत काळे