अतिक्रमणास प्रोत्साहित करणाऱ्या नोंदी रद्द करा ! महूद ग्रामपंचायतीच्या निर्णयाबाबत "बीडीओं'चा आदेश 

gram_panchayat
gram_panchayat
Updated on

सांगोला (सोलापूर) : तालुक्‍यातील महूद ग्रामपंचायतीने वैयक्तिक मालकीच्या खासगी जागेत गावठाण क्षेत्र दाखवून अतिक्रमण करण्यास प्रोत्साहन दिले आहे. मात्र नागरिकांनी तक्रार केल्यानंतर अतिक्रमणास प्रोत्साहित करणाऱ्या या नोंदी रद्द कराव्यात, असा आदेश सांगोल्याचे गटविकास अधिकारी यांनी महूद ग्रामपंचायतीस दिला आहे. 

महूद हे सुमारे वीस हजार लोकसंख्येचे गाव. जत - मुंबई व पंढरपूर - मल्हारपेठ अशा दोन मुख्य राज्य मार्गांच्या मध्यबिंदूवर स्थिरावले आहे. परिसरातील पंधरा-वीस खेड्यांची हक्काची बाजारपेठ म्हणून या गावाचा लौकिक आहे. येथे व्यापार, उद्योग यांची बरकत होण्यास मोठा वाव आहे. विशेषतः महामार्गालगतच्या जमिनी या दृष्टीने महत्त्वाच्या बनल्या आहेत. 

महूद ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत माहिती देताना श्‍लेषा कारंडे यांनी सांगितले, की पंढरपूर-मल्हारपेठ महामार्गालगत त्यांची वडलोपार्जित मालकीची वहिवाटीची जमीन आहे. गट क्रमांक 1927 व 1928 मध्ये कोणतेही गावठाण नाही. याबाबत महसूल व भूमी अभिलेख कार्यालयाकडील पुराव्यात गावठाण पुराव्यांची कसलीही नोंद नाही. तरीही महूद ग्रामपंचायतीने 26 जून 2019 च्या मासिक सभेत ठराव घेऊन या खासगी मालमत्तेत गावठाण दाखविले आहे आणि वैयक्तिक मालकीच्या जागेत दुसऱ्याच व्यक्तीच्या मालमत्ता क्रमांक 3513 ची बेकायदेशीर नोंद केली आहे. 

नागरिकांच्या मूलभूत हक्काचे संरक्षण करण्याऐवजी महूद ग्रामपंचायतीने अतिक्रमणास प्रोत्साहन दिले आहे. अतिक्रमण करणाऱ्याने ग्रामपंचायत उताऱ्याचा आधार घेत 26 ऑक्‍टोंबर 2020 पासून या क्षेत्रात अतिक्रमण केले आहे. अगोदर बेकायदेशीर नोंद व नंतर दीड वर्षाने बेकायदेशीर अतिक्रमण करण्याचा हा प्रकार ग्रामपंचायतीने संबंधित भोगवटादार यांच्याशी संगनमत करून केला आहे. ग्रामपंचायतीच्या या बेकायदेशीर कृत्याविरुद्ध श्‍लेषा कारंडे यांनी गटविकास अधिकारी कार्यालयासमोर उपोषण करून ही बेकायदेशीर नोंद रद्द करून अतिक्रमण तत्काळ हटविण्यात यावे, अशी मागणी केली. 

दरम्यान, गटविकास अधिकारी यांनी याबाबत चौकशी करून या नोंदी रद्द करण्याचा आदेश ग्रामपंचायतीस दिला असल्याचे श्‍लेशा कारंडे म्हणाल्या. 

गटविकास अधिकारी यांनी दिलेला आदेश पाहिला नाही. आदेश पाहून याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल. 
- जे. एन. टकले, 
प्रशासक, महूद ग्रामपंचायत 

गटविकास अधिकारी यांचा आदेश प्राप्त झाला आहे. सध्या प्रशासकीय कारकीर्द असल्याने याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल. 
- आत्माराम कोळी, 
ग्रामसेवक, महूद ग्रामपंचायत 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Mohol Ganesh Mandal News
Pune Teachers Constituency
Semi-Constructed Water Tank Poses Severe Threat to Students
Solapur Hotgi Lake IT Park Project To Get 35 Acres Land As 12 Acres Will Be Reserved For Infrastructure Facilities
Marathi News Esakal
www.esakal.com