Solapur News : भाजप उमेवाराला सर्वसामान्याचा कळवळा येईल का ? भालके

सोलापूर लोकसभेचा उमेदवार ऊसतोड मजुराचा मुलगा असल्याचे सांगतो पण ज्यावेळी तालुक्यातील ऊसतोड कुटुंब अपघातात मृत्युमुखी पडल्यावर का त्यांना भेटायचा कळवळा आला नाही
bhagirath bhalke over bjp candidate social emotions towards people
bhagirath bhalke over bjp candidate social emotions towards peopleSakal

मंगळवेढा : सोलापूर लोकसभेचा उमेदवार ऊसतोड मजुराचा मुलगा असल्याचे सांगतो पण ज्यावेळी तालुक्यातील ऊसतोड कुटुंब अपघातात मृत्युमुखी पडल्यावर का त्यांना भेटायचा कळवळा आला नाही, जर त्यांचा कळवळा येत नसेल तर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक ,शेतकरी ,गोरगरिबांचा कळवळा येईल का ? असा सवाल भगीरथ भालके यांनी तालुक्यातील नंदेश्वर येथे उपस्थित केला.

लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने ते बोलत होते. यावेळी आ. प्रणिती शिंदे, उत्तम जानकर,राहूल शहा, चंद्रशेखर कोंडूभैरी,प्रशांत साळे, प्रा येताळा भगत,

दादा दौलतोडे, गुरुलिंग दोलतडे, पांडुरंग जावळे, ऋतुराज बिले,आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना भालके म्हणाले की,तालुक्यात गाव भेट दौऱ्याच्या निमित्ताने आ प्रणिती शिंदे यांना चिक्कलगी व शिरनांदगी येथील अपघाताची माहिती मिळतात त्यांनी दौरा अर्धवट सोडत त्यामुळे नातेवाईकांना भेट देत धीर देण्याचे काम केले,

मी प्रचारात नसल्यावर उलट-सुलट बातम्या माध्यमातून येत होत्या, भालके इकडे गेले,भालके तिकडे गेले, भालके गायब झाले,स्व नानाची शिकवण आहे की सर्वसामान्य जनतेलाच पक्ष म्हणून जनता सांगेल ती भूमिका घेण्याची त्यामुळे मी कोणताही निर्णय जनतेला विचारल्याशिवाय घेणार नाही.

2014 साली मंजूर झालेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला विरोधकांनी कधी पाणी तर कधी गावे कमी करून अडथळे आणण्याचा प्रयत्न केला,शेजारच्या सांगोला तालुक्याला दुष्काळाचा लाभ मिळतो व ज्या तालुक्याला पाण्याचा अजून पत्ता नाही त्या तालुक्याला दुष्काळाच्या सवलती मिळत नाहीत यापूर्वी तालुक्याला दुष्काळातून वगळल्यानंतर एकाच तालुक्यासाठी स्वतंत्र जी.आर काढण्यासाठी स्व.भारत नानांनी तत्कालीन मुख्यमंत्र्याला भाग पाडले होते.

आ.प्रणिती शिंदे म्हणाल्या की,यंदाच्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षाचा जनाधार सुटल्यामुळे सत्तेसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शाखाप्रमुखासारखे कार्यकर्त्याला धमक्या देत आहेत त्यांना राज्य चालवायचा आहे की धमक्या द्यायच्या आहेत हेच समजेनासे झाले भाजपा सध्या जनतेच्या सहनशीलतेचा अंत बघत आहे आणि हा अंत या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मतदान करून संपवायचा आहे.

आमचे सरकार सत्तेत आलं तर महिलांना महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून सक्षम करणार आहे या भागात प्रत्येक गावाचा यापूर्वीच मी दौरा केला आहे त्यामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर आहे तुम्ही मला संधी दिली तर पाण्यासाठी प्रयत्न करेन.आमच्याकडे मोदीजी गॅरटी नसून काँग्रेसची गॅरंटी असल्यामुळे तुमचे प्रश्न निश्चित मार्गे लावण्यासाठी मी आणि भगीरथ भालके प्रयत्न करणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com