कासेगावात वाढली चुरस ! देशमुख बंधूंच्या विरोधात भालके-काळे गट एकत्र 

Dhumshan.
Dhumshan.
Updated on

पंढरपूर (सोलापूर) : द्राक्ष आणि बेदाणा निर्मितीसाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या कासेगाव (ता. पंढरपूर) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत यंदा प्रथमच एक वेगळे ट्‌विस्ट निर्माण झाले आहे. 50 वर्षांनंतर निवडणुकीच्या निमित्ताने एकत्रित आलेल्या देशमुख बंधूंच्या विरोधात भालके - काळे गटाचे कार्यकर्ते एकत्रित आले आहेत. त्यातच दामाजी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे गटानेही भालके - काळे गटाला साथ दिल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे. 

पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात कासेगावचे महत्त्व नेहमीच अधोरेखित झाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्व असल्याने येथील ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवण्यासाठी यापूर्वी (कै.) आमदार भारत भालके आणि (कै.) सुधाकर परिचार गटाने नेहमीच सत्तासंघर्ष केला. दोन्ही नेत्यांच्या निधनामुळे यंदाच्या ग्रामंचायत निवडणुकीत नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. परिणामी येथील निवडणुकीमध्ये कधी नव्हे ते जिल्हा परिषद सदस्य वसंतराव देशमुख, "विठ्ठल'चे संचालक विजयसिंह देशमुख आणि पंचायत समितीचे उपसभापती प्रशांत देशमुख हे तिन्ही नेते निवडणुकीच्या निमित्ताने एकत्रित आले आहेत. त्यांच्या विरोधात भालके - काळे आणि आवताडे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित स्वतंत्र पॅनेल निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. त्यामुळे सुरवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक आता अत्यंत चुरशीची झाली आहे. 

काळे - भालके व आवताडे गटाच्या उमेदवारांनी विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके, सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे व समाधान आवताडे यांची छायाचित्रे छापून प्रचार सुरू केला आहे. देशमुखांच्या विरोधात उभे असलेल्या भालके - काळे गटाच्या उमेदवारांना आता मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. 

येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडेच तालुक्‍यातील राजकीय नेत्यांचे लक्ष लागले आहे. 

(कै.) आमदार भारत भालके व (कै.) वसंतराव काळे यांनी घालून दिलेल्या विचारांच्या आणि विकासाचा वारसा पुढे चालवण्यासाठी निवडणुकीत भाग घेतला आहे. भारत भालके यांचे विचार आणि भगीरथ भालके यांचे नेतृत्व पुढे नेण्यासाठीच भालके - काळे गटाचे कार्यकर्ते एकत्रित आले आहेत. 
- दाजी देशमुख, 
माजी सरपंच, कासेगाव) 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 

महाराष्ट्र 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Praniti Shinde serves devotees at Machnur Siddheshwar Temple
Uttamprakash Khandare’s Stand on SC Quota
Solapur Weather Update
MSEDCL Load Shedding Hits Penur Farmers Ujani Canal Full But Power Shortage Causes Sugarcane And Other Crops To Dry
Marathi News Esakal
www.esakal.com