Solapur : भालकेंचे सहायक आता आवताडेंच्या मदतीला

मंगळवेढ्यातील संपर्क कार्यालयात सहायक म्हणून स्वीकारली जबाबदारी
Bhalke assistant help to Avatade
Bhalke assistant help to Avatade sakal

मंगळवेढा - स्व. भारत भालके गटाचे कार्यालयीन प्रमुख स्वीय सहायक रावसाहेब फटे यांनी आमदार समाधान आवताडे यांचे सहायक म्हणून जबाबदारी स्वीकारल्याने तालुक्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे.

दुसरीकडे गेली अनेक महिने अनुभवी सहायकाच्या प्रतीक्षेत असलेल्या आमदार आवताडे यांना अनुभवी सहायक मिळाल्याने आवताडे गटाच्या भविष्यातील राजकीय वाटचालीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

मतदार संघ पुनर्रचनेनंतर झालेल्या २००९ च्या पहिल्या निवडणुकीनंतर स्व. भारत भालके यांचे कार्यालयीन प्रमुख म्हणून रावसाहेब फटे यांनी काम पाहिले आहे. त्यानंतर २०१४, २०१९ व २०२१ च्या पोटनिवडणुकीत त्यांनी प्रत्यक्ष भालके गटाची जबाबदारी हाताळण्यात योगदान दिले.

स्व. भारत भालके यांचे कामकाज करताना भालके यांच्या गैरहजेरीत मंगळवेढा कार्यालयाची जबाबदारी ते समर्थपणे पार पाडत. तालुक्यात प्रशासकीय कार्यालयावर त्यांचे नियंत्रण व संपर्क होता. त्यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या लोकांचे प्रश्न सोडवले जात. शिवाय बहुतांश प्रश्नांची त्यांना माहिती देखील झाली होती.

परंतु २०२१ च्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या पराभवानंतर देखील काही दिवस त्यांनी ते काम पाहिले. श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत समविचारी आघाडीची मोट बांधण्यापासून ते कारखान्यात सत्ता बदल होईपर्यंत ते आग्रही होते. परंतु त्यानंतरच्या काळात कुठे माशी शिंकली, याची चर्चा राजकीय वर्तुळात झाली नाही.

मात्र गेले सहा महिने ते भालके यांच्या कार्यालयापासून अलिप्त होते. त्यामुळे यांच्या भूमिकेबद्दल राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा होती. माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा गट मंगळवेढ्यामध्ये विस्तारण्यासाठी अडचणी होत्या. त्यांना देखील कार्यक्षम सहायकाची प्रतीक्षा होती. दुसऱ्या बाजूला विठ्ठल कारखान्याचे अभिजित पाटील यांचा तालुक्यात राजकीय प्रवेशाची चर्चा आहे.

मात्र प्रत्यक्षात मुहूर्त मात्र लांबणीवर पडला आहे. अशा परिस्थितीत राज्यात व केंद्रात एकाच पक्षाचे सरकार असल्यामुळे आमदार आवताडे यांच्या कामाला गती आली. मात्र त्यांच्या कार्यालयाला कार्यक्षम कर्मचारी नसल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत होत्या. दरम्यान, फटे यांच्यावरील जबाबदारीने आमदार आवताडे आता निर्धास्त झाले आहे.

भविष्यात आवताडे गट मजबूत होण्याच्या दृष्टीने फटे यांची जबाबदारी निर्णायक ठरणार आहे, असे मानले जात आहे. दरम्यान, तालुक्यात आधीच बॅकफूटवर असलेली राष्ट्रवादी आणखीनच बॅकफूटवर गेली आहे.

स्व. भालके यांनी रुग्णांृलयातून शेवटचा फोन रावसाहेब फटे यांना करून मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी पाठपुरावा करण्यास सांगितले होते, याची चर्चा तालुक्यात सातत्याने होत असते. आता आमदार समाधान आवताडे व फटे यांना राज्य व केंद्रात सत्ते असल्यामुळे हा प्रश्न मार्गी लागण्याचा मार्ग सुकर झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com