भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशात एक प्रकारचा तमाशा - राधाकृष्ण विखे पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Radhakrishna Vikhe Patil

भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशात एक प्रकारचा तमाशा सुरू असून, त्याच्या पलीकडे मी दुसरे वर्णन करू शकत नाही.

Solapur News : भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशात एक प्रकारचा तमाशा - राधाकृष्ण विखे पाटील

मंगळवेढा - भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशात एक प्रकारचा तमाशा सुरू असून, त्याच्या पलीकडे मी दुसरे वर्णन करू शकत नाही. यात्रा काढून भारत जोडला जात नाही त्यासाठी विकासात्मक कामे उभे करून देशातील सर्व घटकाला त्याचा लाभ झाला पाहिजे, सामाजिक परिवर्तनाच्या योजना ज्याप्रमाणे प्रधानमंत्री मोदींनी आखल्या त्या योजनाच्या माध्यमातूनच भारत जोडला जाईल, अशी प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवेढा पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

येथील उपविभागीय कार्यालयाच्या उद्घाटन समारंभासाठी मंगळवेढा दौऱ्यावर आले होते. उद्घाटनानंतर त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना वरील भाष्य केले. यावेळी आ. समाधान आवताडे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे अवताडे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण, चेतनसिंह केदार राजकुमार पाटील ज्ञानेश्वर कौडूभैरी, आदीसह भाजप पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना विखे पाटील म्हणाले की, शिवसेनेकडे विचाराचे अधिष्ठान राहीले नाही.

स्वातंत्र्यवीर सावरकरा बाबतचा इतिहास तपासावा उलट त्यांच्यावर आरोप करणाऱ्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचे ते समर्थक करत गळाभेट घेतात. हे पाहून बाळासाहेबांच्या मनाला काय वाटत असेल. परंतु, हिंदुत्वाची फरकत घेतल्यामुळे चित्र आपण महाविकास आघाडी सरकारच्या काळात पाहिले आहे, देशद्रोह देशभक्ती करणाऱ्या वर गुन्हा दाखल होत होता.

वैचारिक अधिष्ठान गमावल्यामुळे ठाकरे सरकारला 40 आमदार गमावण्याची वेळ आली. मागील यापूर्वीच्या काळात पवार साहेबांनी पुलोदचा प्रयोग केला, त्यावेळी किती खोके घेतले, आमदार काय विकाऊ वाटले का? असा सवाल करत शिंदे बरोबर आलेल्या आमदाराचे समर्थन केले. केवळ सत्ता गेल्यामुळे वैपल्यग्रस्त अवस्थेतून हे आरोप केले जात आहे. ठाकरे सरकारच्या काळात दोन वर्षात केंद्र सरकारने लसीकरण, ऑक्सिजन, मोफत धान्य केंद्र दिले उलट आम्ही तेल दरवाढ कमी करण्याचे आग्रही मागणी विधानसभेत केले असता, त्यांनी दारूचे दर कमी केल्याचा आरोप केला. मंगळवेढा येथील दुष्काळी परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनाम्याबाबत विचारले असता खोटे आकडेवारी सादर करून चालणार नाहीत, शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही. शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे ही सरकारची भूमिका आहे.