esakal | देवी-देवतांचा अवमान करणाऱ्या ऍमेझॉन कंपनीला महाराष्ट्र व संपूर्ण भारतात बंदी घाला : भाविक वारकरी मंडळ
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavik Warkari

ऍमेझॉन कंपनीने ओम असलेली पायपुसणी व देवी, देवतांची अंतर्वस्त्रे यांची विक्री अमेरिकेसह अन्य देशांत सुरू केली आहेत. याच्या निषेधार्थ भाविक वारकरी मंडळाने याचा तीव्र निषेध करून, ऍमेझॉन कंपनीला महाराष्ट्र व संपूर्ण भारतात बंदी घालावी, अशी मागणी केली आहे. 

देवी-देवतांचा अवमान करणाऱ्या ऍमेझॉन कंपनीला महाराष्ट्र व संपूर्ण भारतात बंदी घाला : भाविक वारकरी मंडळ

sakal_logo
By
श्याम जोशी

दक्षिण सोलापूर (सोलापूर) : ऍमेझॉन कंपनीने ओम असलेली पायपुसणी व देवी, देवतांची चित्रे असलेली अंतर्वस्त्रे यांची विक्री अमेरिकेसह अन्य देशांत सुरू केली आहेत. याच्या निषेधार्थ भाविक वारकरी मंडळाने याचा तीव्र निषेध करून, ऍमेझॉन कंपनीला महाराष्ट्र व संपूर्ण भारतात बंदी घालावी, अशी मागणी केली आहे. 

भाविक वारकरी मंडळाने म्हटले, की ऍमेझॉन कंपनीने ओम असलेली पायपुसणी व देवी, देवतांची चित्रे असलेली अंतर्वस्त्रे यांची विक्री अमेरिकेसह अन्य देशांत सुरू केली आहेत. हा आमच्या संस्कृतीचा व परंपरेचा अपमान आहे. जाणीवपूर्वक अशा गोष्टी करून कंपनीला प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी अनेक कंपन्यांकडून असा प्रयत्न नेहमीच केला जातो. कारण, भारतात सेक्‍युलर या मानसिकतेमुळे काहीही केले तरी चालते, असा समज अनेकांचा आहे. पण ते चालू दिले जाणार नाही. प्रसिद्धीसाठी आमच्या भावना दुखावून जर कुणी स्वतःचा स्वार्थ साधत असेल आणि आमच्या परंपरेचा अपमान करत असेल तर ते आम्ही होऊ देणार नाही. ऍमेझॉन कंपनीचा अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो. 

या वेळी ऍमेझॉन कंपनीवर सर्वांनी बहिष्कार टाकून खऱ्या अर्थाने निषेध व्यक्त करावा, असे आवाहनही भाविक वारकरी मंडळाच्या वतीने करण्यात आले. या ऍमेझॉन कंपनीला महाराष्ट्र व संपूर्ण भारतात बंदी घालण्याची मागणी ई-मेलद्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पंतप्रधान कार्यालयाला करण्यात येणार आहे. 

सोलापूरमध्ये ऍमेझॉन कंपनीच्या लोगोची होळी करून भाविकांनी निषेध व्यक्त केला. या वेळी सुधाकर इंगळे महाराज (राष्ट्रीय अध्यक्ष), बळिराम जांभळे (राष्ट्रीय सचिव ), जोतिराम चांगभले (जिल्हा अध्यक्ष), जगन्नाथ सुतार, बजरंग डांगे, कृष्णदेव बेलेराव, तुकाराम जांभळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

loading image
go to top