

Mangalwedha farmers demand eight hour electricity after Bhima river water release from Ujani and Veer dams
Sakal
मंगळवेढा : सध्या भिमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने नदी दुथडी भरून वाहत आहे मात्र नदीपात्रावर अवलंबून असलेल्या शेतीतील पिकाला पाणी देण्यासाठी वीज मिळत नसल्यामुळे संतप्त नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आठ तास वीज द्यायची असेल तर नदीत पाणी सोडा अन्यथा सोडू नका अशी संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडिया माध्यमातून व्यक्त केली.