solapur : भीमा, सीनाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

solapur

solapur : भीमा, सीनाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

सोलापूर : उजनी धरणात गुरुवारी दुपारी एक वाजेपर्यंत उपयुक्त पाणीसाठा १०८.०८ टक्के इतका झाला असून, जिल्ह्यात गुरुवारपर्यंत ४२४ मिलिमीटर पाऊस पडला आहे. गुरुवारी एकाच दिवसात जिल्ह्यात २५.६ मिलिमीटर पावसाची नोंद असून, जिल्हा प्रशासनाने भीमा व सीना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

सद्यस्थित उजनी धरणाच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु असून धरणाच्या उपयुक्त पाणी साठ्यामध्ये लवकरच मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदीमध्ये ५० हजार क्युसेकने विसर्ग सुरु होता. आज (गुरुवारी) दुपारी दोन वाजता उजनी धरण सांडव्यावरून भीमा नदीमधील विसर्गामध्ये वाढ करून ६० हजार क्युसेकने विसर्ग करण्यात आलेला आहे. त्यामुळे नदीतील एकूण विसर्ग सांडवा ६० हजार क्युसेक व विद्युतगृह १६०० क्युसेक असा एकूण ६१ हजार ६०० क्युसेक विसर्ग भीमा नदीमध्ये राहणार आहे.

पावसाच्या प्रमाणानुसार व धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकनुसार विसर्ग कमी-जास्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी दक्षता घेणे आवश्यक असल्याने जिल्हा प्रशासनाने भीमा, सीना नदीकाठच्या गावांमधील नागरिकांनी सतर्क राहावे. संभाव्य पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे.मोठ्या प्रमाणात सोडलेल्या विसर्गांमुळे नदी, नाले, ओढे यावर असलेल्या पुलावरील गार्ड स्टोनवरून पाणी वहात असल्यास कोणीही पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन केले आहे.

मेघ गर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता

प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून सोलापूर जिल्ह्यात ता. ७ ते ता. ११ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविलेली आहे. या कालावधीत नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.

Web Title: Bhima Seena Villages Warning Solapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SolapurVillagesRiverBhima